वॉशिंग्टन: अमेरिकेत करोनाचा संसर्ग थैमान घालत असताना राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पदेखील चर्चेत असतात. व्हाइट हाऊसमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत पत्रकाराच्या प्रश्नावर संतापून त्यांनी पत्रकार परिषद अर्ध्यावर सोडून निघून गेले. 

अमेरिकेत करोनाच्या संसर्गाने हाहाकार माजवला आहे. अमेरिकेत करोनामुळे प्राण गमावलेल्या नागरिकांची संख्या ८० हजारांहून अधिक झाली आहे. व्हाइट हाऊसमध्ये करोनाबाबतची माहिती देण्यासाठी दररोज पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात येते. या पत्रकार परिषदेत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पही सहभागी होत असतात. या पत्रकार परिषदेत आशियाई महिला पत्रकार जियांग यांनी ट्रम्प यांना लसीच्या चाचणीबाबत प्रश्न विचारला. अमेरिकेत ८० हजारांहून अधिकजणांचा मृत्यू झाल्यानंतरही लस चाचणीला आपण जागतिक स्पर्धा म्हणून पाह आहात का, असा थेट प्रश्न विचारला. त्याला ट्रम्प यांनी उत्तर देताना चीनलाच विचारा असे तिरकस उत्तर दिले. त्यानंतर ट्रम्प पुढील प्रश्नाकडे वळणार असताना जियांग यांनी मला तुम्ही विशेष उल्लेखून असं उत्तर देत आहात, का असा प्रतिप्रश्न केला. त्यावर आपण सगळ्यांनाच उत्तर दिले असून जे मला वाईट प्रश्न विचारतात त्यांनाही माझे हेच उत्तर असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले. त्यानंतर ट्रम्प यांनी पत्रकार परिषदतेतून काढता पाय घेतला. 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने