★ खाकी वर्दीतला देव माणूस..
◆ ठेकेदार ने पगार दिला नाही म्हणून आत्महत्या करणाऱ्या कामगाराचा पोलिसांनी जीव वाचवून मदत म्हणून दिले १०,००० रुपये..
◆ सांगली जिल्यातील कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत महाराष्ट्र कॅन्टीन जवळ असणारा कोमल फुड्स या कंपनीमध्ये ठेकेदाराकडे काम करणारा कामगार रायबा हरिश्चंद्र कांबळे वय 30 राहणार मिरज एमआयडीसी यास त्याच्या ठेकेदाराने पगार देण्यास टाळाटाळ केल्यामुळे असह्य होऊन चक्क कामगाराने वडाचा झाडावर चढून गळ्यामध्ये दोरी अडकून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
◆ जोपर्यंत मला पगार मिळत नाही तोपर्यंत मी खाली येणार नाही नाहीतर मी आत्महत्या करणार असे ओरडू लागला. हे सगळ घटना रूपांतर एक तास चालू होते ही घटना कळताच कुपवाड एमआयडीसी पोलीस स्टेशनचे गोपनीय पोलीस कर्मचारी पोलीस नाईक महेश जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली.
◆ तू आत्महत्या करू नकोस, तुझा जीव महत्वाचा आहे, तुझ्यासाठी आम्ही पोलीस आहोत ना, मी तुला पैसे देतो, तू खाली ये असे समजावून त्याला खाली उतरून स्वतः जवळचे १०,००० देऊन कामगाराचा जीव वाचवला आहे.
#khakikeHero
टिप्पणी पोस्ट करा