२१ वं शतक भारताचं आहे, असं मागच्या शतकापासून आपणं ऐकत आलोय. करोना संकटानंतरही जगात निर्माण होणारी स्थिती आपण न्याहाळत आहोत. भारताच्या नजरेतून पाहिलं तर २१ वं शतक भारताचं असावं हे आपलं स्वप्नच नाही तर ही आपली जबाबदारीही असावी. जागतिक स्थिती आपल्याला एकच मार्ग दाखवतेय... स्वावलंबी भारत...
स्वावलंबी भारताची ही भव्य इमारत पाच खांबांवर आधारीत असेल.
अर्थव्यवस्था : एक अशी अर्थव्यवस्था जी Incremental change नाही तर Quantum Jump आणेल.
पायाभूत सुविधा : पायाभूत सुविधा आधुनिक भारताची ओळख बनेल
प्रशासन व्यवस्था : आपली नवी व्यवस्था २१ व्या शतकाचं स्वप्न साकार करणारी टेक्नॉलॉजी व्यवस्थेवर आधारीत असेल.
२० कोटींचं आर्थिक पॅकेज
हे सांगतानाच भारताला स्वावलंबी बनवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २० कोटींच्या पॅकेजची घोषणा केलीय. अर्थव्यवस्थेत मागणी आणि पुरवठा हे चक्र पूर्ण क्षमतेनं वापरलं जाण्याची गरज आहे. मागणी वाढवण्यासाठी आणि ती पूर्ण करण्यासाठी प्रत्येक जण सक्षम असायला हवा. विशेष आर्थिक पॅकेज स्वावलंबी भारत अभियानासाठी महत्त्वाचं ठरेल. हे पॅकेज भारताच्या जीडीपीच्या जवळपास १० टक्के आहे. हे पॅकेज स्वावलंबी भारताला एक नवी गती देणार, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय.
सोमवारी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक
कालच (११ मे रोजी) देशातील विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना विश्वासात घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक आयोजित केली होती. या बैठकीसाठी नरेंद्र मोदी यांच्यासोबत गृह मंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, अर्थ मंत्री निर्मला सीतारमण हेदेखील उपस्थित होते. लॉकडाऊनकाळात मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधानांची ही पाचवी बैठक ठरली. १७ मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊनचा कालावधी पूर्ण होतोय, याच पार्श्वभूमीवर या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं.
देशातील करोना फैलाव
या अगोदर, २४ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदा देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा केली होती. हे लॉकडाऊन एव्हाना तीन टप्प्यांत वाढवण्यात आलंय. देशव्यापी लॉकडाऊनच्या ४९ (१२ मार्च) व्या दिवशीही करोना फैलाव काही थांबण्याचं घेईना. देशात आज सकाळपर्यंत ७०,७५६ करोनाबाधित रुग्ण आढलले आहेत. वर पोहचलीय. यातील २,२९३ जणांनी आपले प्राण गमावलेत तर २२,४५५ जणांवर उपचार यशस्वी ठरलेत. सध्या देशातील वेगवेगळ्यी रुग्णालयांत आणि आरोग्य केंद्रांत ४६,००८ जणांवर उपचार सुरू आहेत.
टिप्पणी पोस्ट करा