नवी दिल्ली : महाचक्रीवादळ (सुपर सायक्लोन) 'अम्फान'नं बुधवारी अक्राळ-विक्राळ रुप धारण केलेलं दिसतंय. पश्चिम बंगाल आणि ओडिशा समुद्र किनाऱ्यांना यामुळे मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात येतेय. आज दुपारपर्यंत किंवा सायंकाळी हे महाचक्रीवादळ समुद्रतटाला धडक देण्याची शक्यता आहे.
● महाचक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर ओडिशातून आत्तापर्यंत १७०४ आश्रय शिबिर स्थापन करण्यात आलेत. धोकादायक ठिकाणांहून जवळपास १ लाख १९ हजार ०७५ स्थानिक रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलंय.
● पश्चिम - मध्य बंगाल खाडीवरून मंगळवारी तीव्रता कमी झालेल्या 'अम्फान'नं आता मात्र महाभयंकर वेग घेतलाय.
● पश्चिम बंगालच्या दीघा आणि ओडिशाच्या पारदीप किनाऱ्यावर बुधवारी सकाळपासून जोरदार वाऱ्यासहीत पाऊस सुरू आहे. आज सायंकाळपर्यंत पश्चिम बंगालच्या सुंदरबनजवळ हे महाचक्रीवादळ धडकेल.
● सुपर सायक्लोन अम्फान आज सकाळी ८.३० मिनिटांनी पारदीपपासून जवळपास १२५ किलोमीटर दक्षिण - पूर्व भागात दाखल झालं होतं - भारतीय हवामान विज्ञान विभाग.
● बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले महाचक्रीवादळ (सुपर सायक्लोन) काही तासांत भारताच्या समुद्र किनारपट्टीला धडकणार आहे. या सुपर सायक्लोनला 'अम्फान' असे नाव देण्यात आले आहे. १९९९ ला असे 'सुपर सायक्लोन' आले होते. आता २१ वर्षांनी दुसऱ्यांदा 'सुपर सायक्लोन' भारताच्या किनारपट्टीवर धडकणार आहे
टिप्पणी पोस्ट करा