आजपासून 'वन नेशन, वन रेशनकार्ड'शी जोडली गेली तीन राज्य











  • One nation one rashtion card
    वन नेअशन वन कार्ड





    ◆ नवी दिल्ली
    : आजपासून 'वन नेशन वन रेशनकार्ड' या व्यवस्थेत ओडिशामिझोरम आणि सिक्कीम या राज्यांचाही समावेश करण्यात आलाय. यासोबतच देशातील एकूण २० राज्यांमध्ये ही व्यवस्था लागू करण्यात आलीय. या व्यवस्थेत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत रेशनकार्ड धारक देशातील या २० राज्यांतील कोणत्याही रेशनिंग दुकानातून धान्य माफक दरात विकत घेऊ शकतील. 

◆  आंध्र प्रदेश, तेलंगणा, गुजरात, महाराष्ट्र, हरियाणा, राजस्थान, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, गोवा, झारखंड, त्रिपुरा, बिहार, उत्तर प्रदेश, पंजाब, हिमाचल प्रदेश, दीव आणि दमन या १७ राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांत 'वन नेशन वन रेशनकार्ड' ही योजना लागू करण्यात आली होती. १ जूनपासून यात ओडिशा, मिझोरम आणि नागालँड या राज्यांचाही समावेश करण्यात आलाय. 


◆ अन्न मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, १ ऑगस्ट २०२० पासून उत्तराखंड, नागालँड आणि मणिपूर या राज्यांचाही 'वन नेशन वन रेशनकार्ड' या योजनेत समावेश केला जाईल. त्यानंतर या योजनेत जोडल्या गेलेल्या राज्यांची संख्या २३ होईल. 

◆  भारत सरकारनं मार्च २०२१ पर्यंत देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेश या व्यवस्थेत जोडण्याचा निर्णय घेतलाय. 


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने