​🔷तेजस FOC विमान भारतीय हवाई दलात सामील

Tejas FOC aircraft fighter plane
तेजस FOC विमान भारतीय हवाई दलात सामील



◆ कोयंबटूर (तामिळनाडू) या शहराजवळ भारतीय हवाई दलाच्या (IAF) सुलूर हवाई तळावर ‘तेजस एमके-1’ या विमानांचा भारताच्या लढाऊ विमानांच्या ताफ्यामध्ये 27 मे 2020 रोजी समावेश करण्यात आला. अशा पद्धतीच्या लढाऊ विमानांचा समावेश ताफ्यामध्ये करणारे भारतीय हवाई दलाचे हे पहिले स्क्वाड्रन आहे.

◆ सुलूर हवाई तळामधल्या ‘फ्लाईंग बुलेट’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या ‘नंबर 18 स्क्वाड्रन’चे पुनरुज्जीवन करण्यात आले आहे. तेजसच्या समावेशामुळे भारतीय हवाई दलाने परिचालन क्षमता वृद्धीच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल टाकले आहे. तेजस एमके-1 मुळे देशाच्या स्वदेशी लढावू विमान बांधणी कार्यक्रमाला चालना मिळणार आहे. तसेच ‘मेक इन इंडिया’ उपक्रमालाही प्रोत्साहन मिळणार आहे.

◆ ‘तेजस एमके-1 FOC’ हे चौथ्या पिढीचे ‘तेजस’ विमान आहे. यामध्ये एकच इंजिन आहे. तसेच ते वजनानी हलके, अतिशय चपळाईने कार्यरत राहू शकते. तसेच सर्वप्रकारच्या हवामान परिस्थितीत बहुविध भूमिका पार पाडणारे हे लढाऊ विमान आहे. तेजसमध्ये हवेतल्या हवेमध्येच इंधन भरण्याची सुविधा-क्षमता आहे.


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने